in

अजय देवगणचा एक सुपरहिरो चित्रपट गुंडाळला

यशराज फिल्मसच्या बॅनरखाली अजय देवगणने एक सुपरहिरो फिल्म स्वीकारली होती. या सिनेमात अजय देवगण खलनायक असणार होता. त्याच्यासाठी एक खास प्रकारचा कॉश्‍च्युम बनवला जाणार होता.

अजय देवगणसाठी हा सिनेमा खूपच महत्त्वाचा ठरणार होता. मात्र आता हा सिनेमा गुंडाळला गेला आहे, असे समजते आहे. डायरेक्‍टर शिव रवैल यांनी हा सिनेमा तूर्तास तरी होल्डवर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. यशराज फिल्मसच्याच बॅनरखाली बनणाऱ्या एका वेबसीरिजचे डायरेक्‍शन ते करणार असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ नाही. या वेबसीरिजमध्ये इरफान खानचा मुलगा बाबिल लीड रोल साकारणार आहे, तर अजय देवगणच्या या सिनेमातून चंकी पांडेचा भाचा अहान पांडे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होता. अहानला मोठ्या धूमधडाक्‍यात लॉंच करण्यासाठी यशराज फिल्म्सने मोठी तयारी केली होती.

मात्र आता हा सिनेमा जवळ जवळ गुंडाळला गेला असल्याची चर्चा आहे. हा सिनेमा का गुंडाळला गेला हेदेखील समजू शकलेले नाही. करोनाचे एक कारण असू शकते. यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा हा सिनेमा कधी सुरू करणार आहे, याची कोणतीही माहिती सध्यातरी उपलब्ध नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोकणातली आश्वासने हवेतच, आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा; अतूल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

School Reopen | मुंबईतील शाळांची घंटा वाजणार; ‘या’ तारखेपासून भरणार वर्ग