in , , ,

राज्यात आज सापडले 3 हजार 837 नवे कोरोना रुग्ण

Record increase in the number of coronaries
Record increase in the number of coronaries
Share

महाराष्ट्रात आज नव्या कोरोना रुग्णांची संख्या काहीशी खालावल्याचे आकडेवारीतून दिसून आले. राज्यात 3 हजार 837 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 837 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 18 लाख 23 हजार 896 इतकी झाली आहे. तर मागील 24 तासांमध्ये 4 हजार 196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 16 लाख 85 हजार 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आज 80 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर कोरोनाची बाधा होऊन आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 47 हजार 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट हा 92.39 टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.59 टक्के आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

…जेव्हा बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण करतो नंदुरबार जिल्हाधिकाऱ्याच्या कार्याचे कौतुक

विधानपरिषदेच्या पदवीधर , शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान