in ,

मालेगाव दगडफेक प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल

संदीप केरुरकर | त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या मालेगाव बंदला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या सतर्कतेने काही वेळातच वातावरण निवळले आहे. आज मालेगावातील जनजीवन पूर्वपदावर येतांना दिसत आहे.

कालच्या दगडफेक घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून जमावातील १० हुल्लडबाजांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यांमधून काही संशयितांना अजूनही ताब्यात घेण्याचे सत्र सुरू असून गुन्हे दाखल करण्याचेही काम सुरू आहे. मालेगावात सध्या सर्वत्र शांतता असून जनजीवन पूर्वपदावर आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बनावटा बियांनांचा शेतकऱ्यांना लाखोंचा फटका

समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – गृहमंत्री