राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच साताऱ्यातील एक वृद्धाश्रमातील २३ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. सातारा येथील सातारा महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमातील २८ ज्येष्ठ नागरिकांना पैकी २३ जेष्ठ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक महागाव येथे दाखल झाले आहे. या वृद्धाश्रमात ५७ ते ७५ वयाचे २८ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. २३ करोना बाधित रुग्णांपैकी सात रुग्णांना कोमोअर्बीडची लक्षणे दिसत आहेत.
बाकीच्यांना किरकोळ लक्षणे आहेत. त्यांचे वय आणि त्यांना दिसून येणारी लक्षणे विचारात घेता सात लोकांना सातारा येथील कोरोना केंद्रावर हलविण्याचा निर्णय घेण्यात डॉक्टरांनी घेतला आहे. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. या बाधितांमध्ये सात रुग्णांना डायबेटिस ब्लड प्रेशर आदी कोमोअर्बीडची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांना सातारा येथील करोना केंद्रावर पाठविण्यात आले आहे. या वृद्धाश्रमातील सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना त्याच ठिकाणी विळीगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत, असे डॉक्टरांनी सांगितलं.
Comments
Loading…