in

मुंबईत 9 तासात 229 मिमी पाऊस; अनेक ठिकाणी मोठं नुकसान

229 mm rain in 9 hours in Mumbai; Big damage in many places
229 mm rain in 9 hours in Mumbai; Big damage in many places
Share

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. आज या पावसाने जोरदार दणका दिला आहे. वादळी वाऱ्यासह नऊ तासात 229 मिमी पावसाचती नोंद झाली. पुढील तीन तासात मुंबईत वादळी वाऱ्यांसह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. पावसाचा तडाखा बसल्यामुळे मुंबईत अनेख ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या तसेच घरांवरील आणि इमारतीवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या.

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जेएनपीटी बंदरात क्रेन कोसळली. पनवेलमध्ये इमारतीचे पत्रे उडाले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासनाने नागरिकांना घरात थांबून राहण्याचा सल्ला दिला आहे.

जसलोक हॉस्पिटलच्या इमारतीवरील पत्रे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेले. तसेच हॉस्पिटलच्या आवारातील उद्यानात असलेले फर्निचर विखुरले. तर जे जे हॉस्पिटलच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने तेथील रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागाला. हॉस्पिटल प्रशासनाची भंबेरी उडाली. पाण्याचा उपसा करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर भायखळा ते मशिद बंदर परिसरात रेल्वे रुळांवर पाणी आले असून यामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनची वाहतूक ठप्प झाली झाली आहे तर जोरदार वाऱ्यामुळे लोकलच्या ओव्हर हेड वायरवर झाडं कोसळल्याने वाहतूकीवर मोठा परिणाम दिसून आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Rainstorm in Palghar! If the rains continue like this, big damage can happen

पालघरमध्ये बचावासाठी एनडीआरएफच्या टीम दाखल

Sir JJ Hospital mismanagement

सर जे जे रुग्णालयाचा भोंगळ कारभार