in

कोणार्क एक्स्प्रेस मध्ये आढळले 21 किलो अमली पदार्थ

सुरेश काटे, प्रतिनिधी
कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या डी 2 बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून 2 लाख 7 हजार रुपये किमतीचा 21 किलो गांजा कल्याण आरपीएफ ने जप्त केला आहे .हा अमली पदार्थ गांजा नारकोटिक्स विभागाकडे सुपूर्द  करण्यात आला असून या गंभीर घटनेवरून हे अमली पदार्थ कोणी कुठून आणले याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.

शुक्रवारी पहाटे २ वाजून ३० मिनिटाच्या वाजण्याच्या सुमारास उडीसाहून कल्याण स्थानकात येत असलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या डी२ बोगीतील एका सीट खाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरपीएफ ला सूचना देण्यात आल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कल्याण आरपीएफचे पोलीस ठाण्याचे प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या पथकाने कोणार्क एक्सप्रेस रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील ७ नंबर फलाटावर दाखल होताच आरपीएफने सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेसची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी केली असता सीट खाली लाल रंगाची ट्रॉली बॅग आणि काळ्या रंगाची सॅग बॅग आढळून आली. हा गांजा नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला असून तो कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास सुरू असल्याचे शुक्रवारी माध्यमांना सांगण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑनलाईन राष्ट्रीय लाठी स्पर्धेत मुरुडच्या श्रावणीला कांस्य पदक

आणि मुली झाल्या सक्षम….