भारताने कोरोना चाचणीत नवा विक्रम केला आहे. देशभरातील चाचण्यांच्या संख्येने 21.15 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 6,20,216 चाचण्या करण्यात आल्या.
देशातील चाचण्यांच्या प्रयोगशाळा आणि इतर साधनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज देशात एकूण 2393 चाचणी प्रयोगशाळा असून त्यात 1,220 सरकारी आणि 1,173 खाजगी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये 21 कोटी 15 लाख 51 हजार 746 चाचण्या करण्यात आल्या. सध्या देशात, राष्ट्रीय स्तरावर रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचा दर 5.20% झाला आहे. प्रती दशलक्ष संख्येमागे दररोज चाचणी होणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. आज भारतात प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात 1,53,298.4 चाचण्या केल्या जातात.
आजपर्यंत (22 फेब्रुवारी) लसीकरणाची एकूण 2,32,317 सत्रे झाली असून त्याद्वारे, आज सकाळी 8 वाजेपर्यंत 1,11,16,854 लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यात आली. यात, 63 लाख 97 हजार 849 आरोग्य कर्मचारी (पहिला डोस) 9 लाख 67 हजार 852 आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस) आणि 37 लाख 51 हजार 153 पहिल्या फळीत कार्यरत कोरोनायोद्धे (पहिला डोस) यांचा समावेश आहे.
Comments
Loading…