लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. यावल तालुक्यातील किनगावजवळ आयशर ट्रक उलटल्यामुळे १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या ट्रकमध्ये २१ जण होते. त्यापैकी १५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
धुळे येथून रावेरकडे हा ट्रक पपई घेऊन जात होता. मृतांमधील सर्व मजूर हे रावेर, आभोडा आणि केऱ्हाळा येथील असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Comments
Loading…