युरोप आणि इतर राज्यांत कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे लक्षात घेऊन राज्यात उद्यापासून ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
ब्रिटनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळला आहे. विशेष म्हणजे, त्याचा प्रसार पूर्वीपेक्षा ७० टक्के अधिक आहे. ब्रिटनमध्ये च्या नव्या प्रकारामुळे हाहाकार माजला आहे. हा धोका लक्षात घेऊन राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्था संबंधीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक बोलावली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतीश पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्यासह अतिरिक्त सचिव सीताराम कुंटे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, कायदा-सुव्यवस्था अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे देखील बैठकीला हजर होते.
हे आहेत महत्त्वाचे नियम
- महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी
- ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू
- युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणारे सर्व प्रवासी विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस राहणार संस्थात्मक क्वारंटाइन
- क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची करणार चाचणी (आरटीपीसीआर)
- क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडणार घरी
- अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवासी होणार होमक्वारंटाइन
- युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करणार
- विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज
Comments
0 comments