in

वसई-विरारमध्ये 14 दिवसांचे कठोर लॉकडाऊन; हे परिसर असतील प्रतिबंधित

Share

संपूर्ण राज्य अनलॉक जाहीर केले असताना आता वसई-विरारमध्ये 14 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.हे लॉकडाऊन निव्वळ 5 प्रभागांसाठी असणार आहे. या लॉकडाऊन द्वारे शहरातील वाढता कोरोना रुग्णांचा आकडा कमी करण्याचा प्रयत्न आहे.

वसई – विरारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. हा कोरोना रुग्णांचा आकडा रोखणे पलिकेसमोर मोठे आव्हान ठरतं आहे.त्यामुळे आता महापालिकेने सर्वेक्षण करुन सर्वाधिक रूग्ण व मृत व्यक्ती आढळ लेला परिसर प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता शहरातील 5 प्रभागात 14 दिवसांची कडक टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार 18 जूनपासून ही टाळेबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

या सर्व बाबींवर पालघर पोलिसांशी ही चर्चा झाली असून प्रतिबंधित भागात पोलीस तैनात असणार आहे. यावेळी नियम तोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्र

प्रभाग समिती   सी- चंदनसार
गांधी चौक विरार पूर्व ( गांधी चौक ते जनकधामपूपर्यंत)
सहकारनगर (विठुरमाळी कंपाऊंड ते मथुरा डेअरी)

प्रभाग समिती    एफ- धानीव-पेल्हार
श्रीरामनगर गेट नंबर 1 ते डोंगपाडा रोड
धानीवबाग नाका ते वेलकम डेअरी
संतोष भुवन
वाकणपाडा
वसई फाटा येथील इंदिरा वसाहत, मिल्लतनगर

प्रभाग समिती   डी- आचोळे
गालानगर (लक्ष्मण अपार्टमेंट ते आनंद वैभव इमारत)
शिर्डीनगर (सीमा इमारत ते ख्रिस्तराज अपार्टमेंट)

प्रभाग समिती   जी- वालीव
तुंगार फाटा ते बाप्पा सीताराम मंदिरापर्यंत
फादरवाडी नाका ते विद्यविकासिनी शाळा
गणेश माळी यांचे घर ते भगत कंपाऊंड

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Pune suicide : पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास लावून आत्महत्या

Petrol-Diesel Price ; सलग तेराव्या दिवशी दरवाढ