in

केंद्रातील १३ खात्यांमध्ये सनदी अधिकाऱ्यांचा ‘समांतर प्रवेश’

लोकशाही न्यूज नेटवर्क

मोदी सरकारच्या काळात प्रशासनात ‘लॅटरल एन्ट्री’ देण्याचे विधेयक पास झाले. यानंतर विविध मंत्रालयात सनदी अधिकाऱ्यांच्या पदांवर थेट बाहेरून एन्ट्री देण्यात आली. यासाठी कोणत्याही परीक्षेची आवश्यकता नसते. एखाद्या क्षेत्रातील महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीची नियुक्ती सनदी अधिकाऱ्याच्या पदावर होऊ शकते. आज काही जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. यामध्ये सहसचिव पदासाठी कॉन्ट्रॅक बेसीसवर अधिकाऱ्यांची भरती होणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अर्थखाते, कृषी मंत्रालय, यासह १३ केंद्रीय खात्यांचा समावेश आहे. यातील काही जागा संचालक पदांसाठी आहेत.

समांतर प्रवेशायामार्फत आयएएस पातळीवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. विशिष्ट क्षेत्रात महत्वाचे योगदान दिल्यानंतर यासाठी व्यक्ती पात्र ठरते.

पुढील खात्यांमध्ये पदांची भरती होणार आहे –

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
आर्थिक व्यवहार नियमन आणि अर्थखाते
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
कायदा आणि न्याय मंत्रालय
शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालय
उच्चशिक्षण मंत्रालय
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय
सार्वजनिक आरोग्य आणि कल्याण मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
जलशक्ती मंत्रालय
नागरी उड्डाण मंत्रालय
कौशल्य विकास मंत्रालय

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मोदीचं बजेट भांडवलदार मित्रांसाठीच, शेतकरी मात्र उपेक्षित…’