in

127th Amendment Bill । 127 वी घटनादुरुस्तीला लोकसभेत मंजुरी

127वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने लोकसभेत मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजूने 386 तर विरोधात 0 मतं पडली. एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर झालं आहे. उद्या राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे.  

लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं यावर आज चर्चा झाली. या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारने या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला होता. 

केंद्र सरकारने केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केंद्र सरकारकडे गेला होता. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या सुनावणीतही ही बाब अडचणीची ठरली होती. मात्र नव्या 127 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागासवर्ग निश्चितीचा अधिकार मिळेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कोण होणार करोडपती’च्या ‘कर्मवीर विशेष’ भागामध्ये येणार मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे.

मराठवाड्यातील खादीला देशभरातून मागणी;मराठवाड्यातील तिरंगा देशभर फडकणार