in

Maharashtra SSC exam cancelled : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा होणार – राजेश टोपे

दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात येत आहे. तसेच बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार अशी प्रतीक्षा लागली होती. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग सुद्धा वाढत होता. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच बारावीच्या परीक्षा मात्र होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अधिकृत तारीख देण्यात आली नाही आहे. मात्र राज्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यास या परीक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होतं आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचं आरोग्य आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra lockdown: महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन होणार- अस्लम शेख

Maharashtra Vaccination: ”महाराष्ट्रात लसीकरण युद्धपातळीवर करणार”