in

Omicron Corona | दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजार प्रवासी नागरीक मुंबईत-आदित्य ठाकरे

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरीएंट सापडला आहे. या नव्या व्हेरीएंट नंतर संपुर्ण जग हादरले आहे. या घटनेतच रविवारी आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला. त्यामुळे एकचं खळबळ माजली असताना आता त्याहून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 19 दिवसात मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक हजार लोक आले आहेत. या लोकांची ट्रेसिंग सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आलेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत”. यासोबतच परदेशातून आलेल्या गेल्या १० दिवसांतील सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकारमधील एक मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुंबई आणि बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनचे संशयित रुग्ण असल्याचं विधान केलं आहे. मुंबईत सध्या एक संशयित रुग्ण असून त्याची माहिती घेतली जात आहे. तसेच केंद्र सरकारच्या नियमावलीची वाट न पाहता काळजी घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

December Bank Holiday | डिसेंबरमध्ये 12 दिवस बँका बंद…पाहा संपूर्ण यादी

शेतकऱ्यांची वीज बिल माफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला इशारा