in ,

मिरा भाईंदर मध्ये ३ मे पर्यंत १०० टक्के लॉकडाऊन, शहरात १५२ कोरोनाग्रस्त

Share

ठाणे: मिरा भाईंदर मध्ये मंगळवारी ७ रुग्ण नवीन रुग्ण आढळले; कोरोनाच्या लागण झालेले एकूण १५२ रुग्ण झाले आहेत तर अजून १४ जणांचे अहवाल प्रलंबित तर आनंदाची बातमी म्हणजे आज एकूण ३ रुग्ण बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण ४४ कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे झाले आहेत. तर २ कोरोना बाधितांचा मृत्य झाला आहे. तर नवीन रुग्णामध्ये ५ पुरुष व १ महिलेचा व एका ४ वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे.

नवीन रुग्णामध्ये मिरारोड येथील गार्डन सिटी, समोरील पर्ल डायमंड येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्ण आहे तर नयानगर येथील ४० वर्षीय पुरुष आहे, सुंदर नगर येथील २६ वर्षीय महिला आहे, भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील ३४ व २९ वर्षीय पुरुष आहे तर ४ वर्षाची लहान मुलींचाही समावेश आहे, तर भाईंदर पूर्वेच्या नवघर गाव तलावजवळील ३७ वर्षीय रुग्ण आहे ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात ४ रुग्ण हे कोरोना पेशंटच्या संपर्कात आल्याने झालेला आहे तर ३ जण हे नव्याने आढळून आले आहेत.

शहरात कोरोनाचे रुग्ण नव नव्या भागात आढळून येत असल्याने मीरा भाईंदरकरांनी आता गांभीर्याने घेतले नाही तर कोरोनाचा विळखा अधिक वाढण्याचा भीती व्यक्त होत आहे म्हणून आयुक्तांनी हा आदेश पारित केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर मध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकाने २८ एप्रिल मध्यरात्री ते ३ मे पर्यंत बंद करण्यात येत आहेत, आता मिरा भाईंदर १०० टक्के लॉकडाउन करण्यात येत आहे. या बंद मध्ये अन्नधान्यची दुकाने, डी मार्ट, स्टार बाजार, बिग बाजार, ई शॉपिंग मॉल, मटण, चिकन, मासळी, भाजीपाला आणि फळांचे दुकानांचा समावेश आहेत.

दरम्यान, औषधाची दुकाने नेहमीच प्रमाणे सुरू राहतील, तर दूध डेअरी ह्या सकाळी ७ ते ११ पर्यंतच चालू असतील व अत्यावश्यक वस्तूच्या घरपोचसेवा दररोज सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहतील पिठाच्या गिरणी मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील व अत्यावश्यक सुविधा देणारे सर्व पेट्रोल पंप व लॅब, डायगोंस्टिक सेंटर पावसाळ्यापूर्वी कामे करणारे यांना यातून वगळण्यात आले आहे बाकी सर्व बंद राहतील, मिरा भाईंदर कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉटच्या दिशेने चाललेला आहे त्यामुळे पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी एक आदेश काढीत पुढील दिवस १०० टक्के लॉकडाऊन केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबईतील कोरोनाच्या बळींची संख्या २४४ वर, दिवसभरात ३९३ नवे कोरोनाचे रुग्ण

महासत्ता अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरुच, गेल्या २४ तासात २२०० जणांचा मृत्यू