in ,

उत्तराखंड : 21 वर्षे आणि 10 मुख्यमंत्री, एकानेच केला कार्यकाळ पूर्ण

उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून तीरथसिंह रावत यांनी बुधवारी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. गेल्या 21 वर्षांतील उत्तराखंडचे ते 10वे मुख्यमंत्री आहेत. 10पैकी फक्त एकानेच आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.

उत्तराखंडची निर्मिती 9 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. त्यावेळी नित्यानंद स्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. 29 ऑक्टोबर 2001 असे जवळपास 11 महिने ते मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 30 ऑक्टोबर 2001 रोजी नवे मुख्यमंत्री झाले. पण अवघे चार महिने (1 मार्च 20002) ते या पदावर होते. त्यानंतर काँग्रेसच्या नारायणदत्त तिवारी मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला. 2007मध्ये निवडणूक घेतल्यानंतर भाजपाचे भुवनचंद्र खंडुरी मुख्यमंत्री झाले.

हरीश रावत 1 फेब्रुवारी 2014 ते 11 मार्च 2017 या कालावधीत मुख्यमंत्री होते. त्यांच्याविरोधात पक्षाच्या नऊ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात 25 दिवस राष्ट्रपती राजवट होती. आता त्रिवेंद्र सिंह हे नववे मुख्यमंत्री होते. पक्षातील अंतर्गत विरोधामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 18 मार्च 2017 ते 9 मार्च 2021 अशी जवळपास चार वर्षे ते मुख्यमंत्रीपदी होते. त्यांच्या जागी आता तीरथसिंह रावत यांनी सूत्रे हाती घेतली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साताऱ्यातील वृद्धाश्रमातील २३ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा

कसोटीपाठोपाठ टी-20च्या रँकिंगमध्ये भारताची भरारी