in

आमदार निधीत १ कोटीची वाढ

गेल्या वर्षभरापासून सर्वत्र कोरोनाचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्वपक्षीय आमदारांचं वेतनामध्ये ३० टक्क्यांची कपात करण्यात आली होती . त्यामुळे सर्वच आमदारांना ७० टक्के वेतन मिळत होतं. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांचे वेतन येत्या १ मार्चपासून पुन्हा पूर्ववत केलं जाईल, असे विधानसभेत जाहीर केलं. त्यावेळी पूर्ण अधिवेशनात आक्रमकपणे एकमेकांविरोधात उभ्या राहिलेल्या सर्वपक्षीय आमदारांनी अर्थमंत्री अजित पवारांच्या घोषणेला दाद दिली.

दरम्यान, यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी आमदार निधीमध्ये देखील वाढ केल्याचं जाहीर केलं. “कोरोना काळात स्थानिक विकास निधीला कट लावलेला नाही. शेवटच्या काळात ३ कोटी रुपये आमदार निधीदेखील सगळ्यांना देण्याची सोय केली. सरकार कुणाचंही असलं, तरी आमदार निधी सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यंदाच्या वर्षी करोनाचं संकट असलं, तरी आमदार निधी ४ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपये जातील, मात्र, त्याची तरतूद केली जाईल”, असं अजित पवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाशिवरात्री विशेष : ‘आत्मारामा’ला शोधायचा प्रयत्न म्हणजेच ‘महाशिवरात्र उपासना’

‘मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या’ – उदयनराजें भोसले