in

माळशेज घाटात कार 100 फूट खोल दरीत कोसळून पेटली..

कल्याण अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
माळशेज घाटात प्रवासी कार दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत कार संपूर्णपणे जळून खाक झाली.


नेमकं काय घडलं?

रविवारी पहाटेच्या सुमारास कल्याण अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात अपघात झाला.अपघातात कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.


गाडी शंभर फूट खोल दरीत

रविवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणहून आंबेगावला निघालेल्या प्रवासी कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी शंभर फूट खोल दरीत कोसळली. यानंतर गाडीने पेट घेतला.


अपघातात कार जळून खाक

याच दरम्यान या महामार्गावरुन जाणाऱ्या औरंगाबादच्या ए टू झेड या अॅडव्हेंचर ग्रुपच्या मदतीने पोलिसांनी जखमींना खोल दरीतून बाहेर काढलं. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघातात कार जळून खाक झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जमात-उद-दावाच्या सहा दहशतवांद्यांची निर्दोष मुक्तता

कॅन्सरविषयी जनजागृती करणारा ‘राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिन’