in

फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्याच्या बहाण्याने केलं ‘पॉर्न शूट’..अभिनेता ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क

फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अश्लील चित्रफिती बनवणाऱ्या कंपनीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. मालमत्ता शाखेने मालाड मालवणी परिसरात केलेल्या कारवाईत दोन अभिनेत्यांनाही अटक झाली आहे.

बॉलीवूडमध्ये काम देण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडीओ बनवून आरोपी एका पॉर्न वेबसाइटवर ते प्रदर्शित करत होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या कारवाईत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन अभिनेते, 4 कॅमेरामन, लाईटमन यांचा समावेश आहे.

चौकशी दरम्यान अनेक अश्लील व्हिडिओ पॉर्न साईट्सवर प्रदर्शित केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. हॉट हिट मूव्हिज या अॅपवर हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी याची वेबसाईट देखील बंद केली आहे.

तरुणींना फिल्म इंडस्ट्रीचे आमिष दाखवून आरोपींनी हा डाव साधल्याचे तपासात समोर आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मोदीचं बजेट भांडवलदार मित्रांसाठीच, शेतकरी मात्र उपेक्षित…’

‘द फॅमेली मॅन 2’चं प्रदर्शन लांबणीवर